ईव्हेंट मॅनेजमेंट व्यावसायिकाच्या मर्सिडीज गाडीतून लंपास केलेल्या रक्कमेचा छडा लावण्यात नौपाडा पोलीसांना यश

मुंबईतील ईव्हेंट मॅनेजमेंट व्यावसायिकाच्या मर्सिडीज गाडीतून लंपास केलेल्या रक्कमेचा छडा लावण्यात नौपाडा पोलीसांना यश आलं आहे. ही चोरी व्यावसायिकाच्या बदली चालकानंच त्याच्या दोन साथीदारांसह केल्याचं उघडकीस आलं असून पोलीसांनी त्याला अटक केली आहे. गुरूवारी हा प्रकार घडला. ललित शर्मा यांचा ईव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय आहे. त्यांचा चालक गावी गेल्यानं त्यांनी मुंबई ड्रायव्हर सर्व्हीसेसमधून विशाल शिंदे याला बदली चालक म्हणून घेतले होते. ललित यांचा विवाह असल्यानं त्यांच्या बहिणीनं लग्नाच्या खरेदीसाठी दिलेले १ लाख ९० हजार रूपये लॅपटॉपच्या बॅगेत ठेवले होते. ही बॅग त्यांनी आपल्या मर्सिडीजच्या डिकीमध्ये ठेवली होती. एका इव्हेंट संदर्भात बैठकीसाठी ते रौनक टॉवरमध्ये आले होते. यावेळी चालक विशाल शिंदे गाडीतच थांबला होता. मध्यरात्री बैठक संपल्यानंतर ललित कांदिवलीला घरी पोहचल्यावर रोकड असलेली बॅग डिकीत नसल्याचं आढळलं. त्यांनी याबाबत ड्रायव्हर विशालला विचारलं असता त्याने याबाबत काही माहिती नसल्याचं सांगितलं. याप्रकरणी ललित शर्मा यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. नौपाडा पोलीसांनी गाडी उभी करून ठेवलेल्या ठिकाणी असलेल्या सराफी पेढीच्या क्लोज सर्कीट कॅमे-यातील चित्रीकरणाची तपासणी केली असता विशालसह त्याचे दोन साथीदार गाडीच्या डिकीतून बॅग लंपास करताना दिसले. त्यामुळं विशालला पोलीसांनी अटक केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading