कोपरी परिसरात नकली पोलीस म्हणून मिरवणा-या आणि मुलींची छेड काढणा-यास महिलांनी दिला चोप

कोपरी परिसरात नकली पोलीस म्हणून मिरवणा-या आणि मुलींची छेडछाड करणा-या प्रकाश कोटवलेला या परिसरातील महिलांनी चोप दिला. प्रकाश कोटवले हा पोलीस असल्याचं भासवत मुलींची छेड काढत असे. यामुळं पिडीत महिलांनी चोप देऊन त्याला पोलीसांच्या ताब्यात दिलं होतं. पोलीसांनी त्याला अटकही केली होती. त्यानंतर काही कारणांनी तो जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल झाला आणि तिथून तो पळून गेला. ज्या महिलांनी त्याला मारहाण केली होती त्या महिलेच्या भावाला त्यानं मारहाण केली. तोही रूग्णालयात दाखल असल्याचं सांगितलं जातं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading