​शिवसेना राष्ट्रवादी मधील लसीकरणाच्या राजकारणात आता काँग्रेसची उडी

शिवसेना राष्ट्रवादी मधील लसीकरणाच्या राजकारणात आता काँग्रेसनं उडी घेतली आहे. सर्वसामान्यांना लस उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी महापालिका मुख्यालयाबाहेर काँग्रेसतर्फे धरणं आंदोलन करण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाच्या विषयावरून राजकीय वातावरण तापलं आहे. सुरूवातीस भारतीय जनता पक्ष त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेवर लसीकरणावरून जोरदार टीका केली होती. आता काँग्रेसही त्यामध्ये पडली असून लस ही सर्वसामान्य जनतेची असल्यानं ती उपलब्ध झालीच पाहिजे. लसीकरणातील राजकारण बाजूला ठेवा, लस नाही कोणाच्या बापाची ती ठाणेकरांच्या हक्काची अशा घोषणा देत निदर्शनं करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading