​परदेशस्थ भारतीयांसाठी दिवाळी फराळाची पहिली खेप ठाण्यातून रवाना

दिवाळी म्हटली की फराळ आलाच. दिवाळीमध्ये फराळाला महत्व असू्न अगदी देशात नव्हे तर परदेशातील भारतीयही फराळासाठी आसुसलेले असतात. अशाच परदेशातील भारतीयांसाठी ठाण्यातून दिवाळी फराळाचा पहिला डबा रवाना झाला. ठाण्यामध्ये मेधा देशपांडे गेली अनेक वर्ष दिवाळी फराळ तयार करतात. त्यांचा हा फराळ परदेशातही प्रसिध्द आहे. दरवर्षी अमेरिका, कॅनडा, जर्मनी, दुबई, स्वित्झर्लंड अशा विविध देशातून दिवाळी फराळाची मागणी असते. गेल्यावर्षी कोरोनामुळे परदेशात फराळ वेळेवर पोहचला नव्हता त्यामुळं यंदा हा फराळ काल पाठवण्यात आला. चिरोटे, चकल्या, खारे आणि गोड शंकरपाळी, तांदळाची चकली, बेक्ड चकल्या-करंज्या, पोहे, मका, पापड आणि पालक चिवडा, कडबोळी असा विविध प्रकारचा फराळ पाठवण्यात आला. मधुमेहींसाठी यंदा फराळाचे काही प्रकार देशपांडे यांनी तयार केले आहेत. शुगरफ्री काजु कतली तसंच फराळाचे काही इतर पदार्थही देशपांडे यांनी तयार केले आहेत. परदेशात जाणारा फराळ पोहचेपर्यंत उत्तम रहावा यासाठी त्याला उच्च दर्जाचं पॅकींगही करण्यात आल्याचं मेधा देशपांडे यांनी सांगितलं. दिवाळी फराळ हा फक्त हिंदूंसाठीच नव्हे तर ख्रिश्चन, शीख तसंच इतर धर्मियांकडूनही मागवला जातो असं सांगून फराळ असा असावा की तो खाऊन समोरचा खूश झाला पाहिजे अशा भावना देशपांडे यांनी यावेळी व्यक्त केल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading