कोकणातील इतिहासाच्या अभ्यासासाठी निधी उपलब्ध झाल्यास मोठे संशोधन होईल – जिल्हाधिकारी

कोकणातील इतिहासाच्या अभ्यासासाठी निधी उपलब्ध झाल्यास मोठे संशोधन होईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले. कोकण इतिहास परिषद आणि बिर्ला महाविद्यालय यांच्या सहकार्याने ही परिषद आयोजित करण्यात आली होती. या आधिवेशनाच्या उद्घाटन समारोहात जिल्हाधिकारी बोलत होते. बिर्ला महाविद्यालयात एकदिवसीय ११वी कोकण इतिहास परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन झाले. कोकणातील इतिहासावर यावेळी संशोधकांनी साधकबाधक चर्चा केली. बिर्ला महाविद्यालयाचा आणि कोकणाचा जवळचा संबंध असून विद्यार्थीदशेत विज्ञान विषय आपण घेतला होता. पण त्यात काही कळत नव्हते त्याचे आत्मपरिक्षण करतांना दिसून आले की या विषयात रमलोच नाही म्हणून पुणे विद्यापीठातून एम.ए.पदवी इतिहास हा विषय घेऊन मिळवली. स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करुन जिल्हाधिकारी झालो, अशा शब्दांत जिल्हाधिका-यांनी इतिहास विषयाशी असलेली विशेष आत्मीयता प्रकट केली. कोकण इतिहास परिषदेने यावर्षी जीवन गौरव  पुरस्कारानं भारतीय इतिहासाच्या कला, स्थापत्य, मूर्तीशास्त्राच्या अभ्यासिका डॉ. कुमुद कानिटकर यांना सन्मानित केलं. गेल्यावर्षीचा उत्कृष्ट शोधनिबंध म्हणून प्रा. कृष्णा गायकवाड आणि डॉ. अजय धनावडे यांच्या शोधनिबंधास पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. या अधिवेशनास जवळजवळ 60 पेक्षा अधिक शोधनिबंध अभ्यासकांनी पाठवले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading