​छठपूजा गर्दी न करता घरच्या घरी साजरी करण्याचं महापालिकेचं आवाहन

उद्याची छठ पूजा ही साध्या पध्दतीनं गर्दी न करता आणि घरच्या घरी साजरी करावी असं आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आलं आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी धोका कायम आहे. ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सुचनांनुसार कोरोनाचे नियम शिथील करण्यात आले असले तरी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर एकत्रित येण्यावर निर्बंध कायम ठेवले आहेत. शक्यतो कार्यक्रमांचे ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुक इत्यादी माध्यमांद्वारे प्रसारण करण्यावर भर देण्यात यावा असे आवाहन महापौर आणि आयुक्तांनी केले आहे. कोविड संसर्गामुळे बंद करण्यात आलेली ठाणे महापालिका क्षेत्रातील धार्मिक स्थळे खुली करण्यात आली असली तरीही छठपूजा उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहिल याची दक्षता घ्यावी. नागरिकांनी नदी, तलाव अथवा समुद्राच्या काठी एकत्र न येता गर्दी टाळावी आणि घरीच थांबून साध्या पद्धतीने छठपूजा साजरी करावी. विशेष करुन ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडण्याचे शक्यतो टाळावे. ठाणे शहरामध्ये छठपूजेसाठी उपवन तलाव, कोलशेत विसर्जन महाघाट, रायलादेवी तलाव, दत्तघाट, कोपरी खाडी, पारसिक विसर्जन महाघाट, पारसिक रेतीबंदर या अस्त‍ित्वात असलेल्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी गर्दी करणे टाळावे. छठपूजेच्या दरम्यान फटाके फोडण्याचे टाळावे. छठपूजा कार्यक्रमाच्या ठिकाणी मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे, जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही. छठपूजा उत्सवाच्या ठिकाणी कोणत्याही स्वरुपाचे मंडप उभारण्यात येऊ नयेत असं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading