होळी सणाबाबत महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना

होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी हे उत्सव नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर एकत्र न येता साधेपणानेच साजरे करण्याच्या सूचना ठाणे महापालिकेनं जारी केल्या आहेत. कोविडमुळे गेल्या दोन वर्षांपासून सर्व सणउत्सव नागरिकांनी घरात राहूनच साजरे केले आहेत. कोरोनाचे संक्रमण अद्याप सुरू असून यावर्षीही होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण आरोग्याची काळजी घेऊन साधेपणाने साजरे करावेत अशा सूचना महापालिकेनं दिल्या आहेत. याबाबत महापालिकेनं काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सणांच्या वेळी एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, गुलाल उधळणे हे टाळून साधेपणानं सण साजरा करावा. ज्या ठिकाणी पालखीची मिरवणूक काढण्यात येते त्या ठिकाणी यावर्षीही पालखी घरोघरी न नेता स्थानिक मंदिरातच दर्शनाची व्यवस्था करावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading