प्लास्टीक बंदी कारवाई अंतर्गत २६ हजार रुपये दंड वसुली तर २४ किलो प्लास्टिक जप्त

ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाच्या वतीने प्लास्टीक बंदी कारवाई अंतर्गत शहरातील दुकानांमधील २४ किलो प्लास्टिक जप्त करून २६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सूचनेनुसार ७५ मायक्रॉनपेक्षा कमी असलेल्या एकदाच वापर होणाऱ्या प्लॅस्टिक पिशव्या, भांडी आणि थर्माकोल यांसारख्या अविघटनशील वस्तू वापरण्यास बंदी घालण्यात आली असून या वस्तूंचा वापर आढळल्यास संबधितांवर दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहरात प्लास्टीक बंदी, माझी वसुंधरा आणि स्वच्छता मोहिमेअंतर्गत स्वच्छता तसेच प्लस्टिक बंदीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सर्व प्रभाग समितीस्तरावर उपक्रम राबविण्यासोबतच प्लास्टिक वापरणाऱ्या आस्थापनेवर कडक कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी प्रदूषण नियंत्रण विभागास दिले आहेत. त्या आदेशानुसार महापालिकेच्या सर्व प्रभागसमिती स्तरावर प्लास्टिक वापरणाऱ्या आस्थापनावर कडक कारवाई करण्याचे काम सुरु आहे. प्लास्टीक बंदी कारवाईतंर्गत आज मुंब्रा प्रभाग समिती समितीमध्ये एकूण १५ हजार ५०० रुपये दंड आणि ११ किलो प्लास्टीक जप्त, तर वागळे प्रभाग समितीमध्ये एकूण १० हजार ५०० रुपये दंड आणि १३ किलो प्लास्टीक जप्त करून १० हजार रुपयांच्या दंडात्मक नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading