होळी-धुळवड साजरी करण्यावर शासनाचे काही निर्बंध

होळी उद्या साजरी होत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनानं होळी आणि धुळवड साजरी करण्यासंदर्भात नियमावली जारी केली आहे. रात्री १० वाजेपर्यंतच होळी प्रज्वलित करता येईल त्यानंतर होळी प्रज्वलित करायला मनाई आहे. सध्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असल्यामुळे होळीच्या काळात डीजे आणि लाऊडस्पीकर लावता येणार नाही. डीजे लावल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. धुळवड खेळताना कोणावरही जबरदस्तीनं रंग अथवा फुगे मारता येणार नाहीत. तसंच होळी-धुळवड साजरी करताना कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यास मनाई करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading