के.ग.जोशी कला आणि ना.गो.बेडेकर वाणिज्य महाविद्यालयातील 200 विद्यार्थ्यांच्या इंडस्ट्रीयल व्हिजिटचे आयोजन

विद्या प्रसारक मंडळाच्या के.ग.जोशी कला आणि ना.गो.बेडेकर वाणिज्य महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागातर्फे प्रथम, द्वितीय आणि तृतीय कलाशाखेतील 200 विद्यार्थ्यांच्या इंडस्ट्रीयल व्हिजिटचे आयोजन विरार येथील अमोल दूध डेअरी येथे नुकतेच करण्यात आले होते. भारत सरकारच्या स्किल डेव्हल्पमेंट अंतर्गत विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण हेरून नवे उद्योजक निर्माण करणे हे महाविद्यालयाचे मुख्य धोरण आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी अतिशय कुतूहलपूर्वक आणि जिज्ञासपूर्वक संपूर्ण दुग्ध व्यवसायाची पाहणी केली. यामध्ये दूध संकलन, साठवणूक, बटर, चीज तसेच इतर दुग्धजन्य पदार्थांचे मार्केटींग, प्रसार करणे, बाजारपेठ निर्माण करणे इत्यादी अनेक गोष्टींचे बारकावे डॉ.दीपक साबळे यांनी विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितले. आजचे शिक्षण हे चार भिंतीच्या बाहेर पडले आहे. व्यवहारात शिक्षणाचा उपयोग व्हावा हे आमच्या प्राचार्यांचे ध्येय असून आम्ही अर्थशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक त्यादृष्टीने प्रयत्न करीत आहोत. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक उद्योजक निर्माण करणे हे आमचे ध्येय असून नोकरी शोधणाऱ्या तरुणांपेक्षा नोकरी निर्माण करणाऱ्या तरुणांची देशाला आणि समाजाला जास्त गरज आहे. त्यादृष्टीने आम्ही सर्वजण प्रयत्नशील असल्याचे विभागप्रमुख डॉ. दीपक साबळे यांनी सांगीतले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading