हिरानंदानी शॉपिंग सेंटरमधील ८ दुकानांना आग

हिरानंदानी शॉपिंग सेंटरमधील काही दुकानांना आज आग लागली होती. सुदैवानं यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही. आज सकाळी ८ च्या सुमारास हिरानंदानी मधील अर्काडीया शॉपिंग सेंटरमधील ८ दुकानांना आग लागली होती. वेलनेस मेडीकल शॉप, प्राईम हार्डवेअर, रेनबो शॉपी, सिटी वाईन्स, प्लॅटीनम हार्डवेअर, गौरव स्वीटस्, मंजू क्रिएशन्स, मिक्स अँड मॅच क्लोथ शॉप अशा ८ दुकानांना ही आग लागली होती. ठाणे महापालिकेचं अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकानं त्वरीत धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली. या शॉपिंग सेंटरमध्ये अग्निप्रतिबंधक नियम तसंच व्यवस्था नसल्याच्या तक्रारी आहेत. अग्निशमन दलाचे तीन बंब, दोन शीघ्र कृती वाहनं, ६ पाण्याचे टँकर, २ जम्बो टँकर, १ जेसीबी अशी यंत्रणा ही आग विझवण्यासाठी कार्यरत होती.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading