हरवलेल्या ३ वर्षाच्या मुलीचा भिवंडी पोलीसांनी अवघ्या पाऊण तासात शोध घेऊन तिला तिच्या पालकांकडे सुपुर्द केले. भिवंडीतील चौथा निजामपुरा भागात राहणारी हुरिया शेख ही तीन वर्षाची मुलगी सोमवारी हरवली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर भिवंडी पोलीसांनी तात्काळ शोध घेण्यास सुरूवात केली आणि अवघ्या पाऊण तासात पोलीसांनी या मुलीचा शोध घेतला. मात्र या मुलीला तिचे नाव आणि पत्ता सांगता येत नव्हते. पण तात्काळ तिला ताब्यात घेऊन नंतर पोलीसांनी चौकशी केली आणि तिच्या पालकांच्या स्वाधीन केले.