स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ठाण्यात 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान ‘स्वराज्य महोत्सव’

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात 9 ते 17 ऑगस्ट या काळात स्वराज महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील स्थानिक प्रशासन, महानगरपालिका, शाळा/महाविद्यालये, पोलीस विभागाने या महोत्सवात आखून दिलेले कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करावे. या महोत्सवात नागरिकांचाही सहभाग घ्यावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे यांनी केले. स्वराज्य महोत्सवाच्या संदर्भात आज उपजिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. स्वराज्य महोत्सवाअंतर्गत जिल्ह्यात 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान विविध उपक्रम, कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये विविध महाविद्यालये, शाळांमध्ये स्वातंत्र्य चळवळीशी निगडीत चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा, सायकलोक्थॉन, मॅरेथॉन, प्रभात फेरी, चित्र प्रदर्शन, ऐतिहासिक वारसा स्थळांच्या ठिकाणी पदयात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम आदी कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहेत. तालुका व जिल्हास्तरावर या कार्यक्रमांचे आयोजन विविध विभागाने करून जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग घ्यावा, अशा सूचना ठोंबरे यांनी यावेळी केल्या.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading