स्मार्ट सिटी योजनेच्या सर्वेक्षणात मोठ्या संख्येने सहभाग घेऊन मत नोंदवाव – महापालिका आयुक्त

स्मार्ट सिटी योजनेच्या सर्वेक्षणात मोठ्या संख्येने सहभाग घेऊन मत नोंदवाव अस आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केलं. शहराच्या नियोजनाचे धोरण ठरवताना नागरिकांचा त्यात सहभाग कसा वाढवता येईल यासाठी एक मार्गदर्शक प्रणाली तयार करण्याचे काम केंद्र सरकार स्मार्ट सिटी योजनेत करत आहे. या प्रक्रियेचे वेगवेगळ्या टप्पे असून जनमानस जाणून घेण्यासाठी नागरिक आकलन सर्वेक्षण 2022 एक नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे. त्यात ठाणेकरांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन आपली मतं नोंदवावी असआवाहन पालिका आयुक्तांनी केलं. या योजनेअंतर्गत शहराशी निगडित विविध स्वरूपाच्या माहितीचे संकलन वेगवेगळ्या विभागाकडून सुरू होत. शहरात वाहतूक कशी असावी, अतिक्रमण व्याप्त जागा किती आहे, शाळा किती आहेत, मैदाना किती आहेत अशी सुमारे 372 प्रकारची माहिती ठाणे महापालिकेने संकलित केली आहे. तर काही माहितीचे संकलन केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी मंत्रालयाने केल आहे. स्मार्ट सिटी उपक्रम हा या मंत्रालयाच्या अंतर्गत येतो याबद्दलची सविस्तर बैठक पालिका आयुक्तांकडे आयोजित करण्यात आली होती. या निमित्ताने केंद्र सरकार माहितीच प्रमाणीकरण करत असून उत्तम कामगिरी करणाऱ्या शहराला पारितोषिक दिल जाणार आहे. यापूर्वी ठाणेकरांनी भारतीय स्वच्छता लीगच्या वेळी उत्तम काम केलं होतं. त्यामुळे सर्वाधिक प्रभाव निर्माण करणारा शहर या गटात ठाण्याला पारितोषिक मिळाले होते. ठाणेकरांच्या जनमताचा कौल यावेळी ही लागेल अशी प्रशासनाला अपेक्षा आहे. देशात झपाट्याने नागरिगीकरण होत आहे 2011 मध्य
31 टक्के लोकसंख्या शहरात होती ते प्रमाण 2030 दुप्पट होण्याची शक्यता आहे. देशाच्या आर्थिक विकासात शहरांचे योगदान महत्वपूर्ण असून शहर सुरक्षित राखणं उत्तम दर्जाची आरोग्य व्यवस्था शिक्षण पायाभूत सुविधा देणे स्वच्छ हवा राखण आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे मोठं आव्हान आहे. या माहितीचे संकलन आणि प्रमाणीकरण होत आहे. केंद्र सरकार द्वारे या माहितीची छाननी झाल्यावर ती नागरिकांसाठी खुला खुली केली जाणार आहे. शहरातील नागरिकांच्या प्रतिक्रिया आणि सूचना जाणून घेण्यासाठी नागरिक आकलन सर्वेक्षण 2022 पासून शंभर शहरात सुरू होणार आहे. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने मत नोंदविता येणार आहे. ही एक प्रकारची स्पर्धा असून देशभर एकाच वेळी शंभर शहरात होणार आहे. ठाण्याला वरचा क्रमांक गाठायचा असून स्मार्ट सिटी आणि पालिकेची यंत्रणा तसेच नागरिक यांना एकत्रित काम करायचं आहे. तसेच माहिती गांभीर्यपूर्वक गोळा केली तर त्या संकलित माहितीचा धोरण ठरवताना उपयोग होईल असेही महापालिका आयुक्तांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading