सोमवारी म्हणजे २४ ऑक्टोबरला नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आल्याची माहिती दा. कृ. सोमण यांनी दिली आहे. सोमवारी म्हणजे २४ ऑक्टोबरला नरक चतुर्दशी करिता आश्विन कृष्ण चतुर्दशी चंद्रोद0 व्यापिनी घ्यावी . चंद्रोदयापासून सूर्योदयापर्यंत अभ्यंगस्नान करावे. दोन दिवस चंद्रोदय व्यापिनी असेल तर पूर्व दिवशींची घ्यावी असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यावर्षी सोमवारी चतुर्दशी असताना पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी चंद्रोदय होत आहे. म्हणून सोमवार २४ ॲाक्टोबर रोजी नरक चतुर्दशी आहे. तर आश्विन अमावास्या प्रदोषकाली असेल त्या दिवशी लक्ष्मी- कुबेर पूजन करावे असे सांगण्यात आले आहे. यावर्षी सोमवार २४ ॲाक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजून २७ मिनिटांनी आश्विन चतुर्दशी संपून अमावास्या सुरू होत आहे. त्या दिवशी संध्याकाळी ६ वाजून ९ मिनिटांपासून रात्री ८ वाजून ३९ मिनिटांपर्यंत प्रदोषकाल आहे. त्यावेळी अमावास्या असल्याने सोमवारीच लक्ष्मीपूजन करायचे असल्याचं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.