ठाणे महापालिकेच्या वतीने सुरु असलेल्या सुशोभिकरण, स्वच्छता आणि फुटपाथ दुरुस्ती कामाची आज महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी पाहणी करून रस्त्याच्या बाजूला असणारी लहान झाडे-झुडपे तात्काळ तोडण्याचे निर्देश संबंधित विभागास दिले. आज सकाळी महापौरांनी आनंदनगर येथून सुशोभिकरण, स्वच्छता आणि रस्ते दुरुस्ती कामाची पाहणी करण्यास सुरूवात केली. आनंदनगर परिसरातील साफसफाई, रंगरंगोटी, तसेच रस्ते दुरुस्ती कामाची पाहणी केली. यावेळी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने रस्त्याच्या बाजूला साचलेला कचरा, माती, झाडांच्या पडलेल्या फांद्या तात्काळ उचलण्याचे निर्देश देतानाच रस्त्याच्या बाजूला असणारी लहान झाडे-झुडपे तात्काळ तोडण्याचे निर्देशही दिले.