सुनिल खांबे यांना ईव्हीएम तोडल्याबद्दल अटक

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामुळे लोकशाही धोक्यात आल्याचा आरोप करत सुनिल खांबे यांनी आज मतदान यंत्रावर काळी शाई टाकत मतदान यंत्र तोडण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर सुनिल खांबे यांना पोलीसांनी अटक केली आहे. ईव्हीएम मशिन मुर्दाबाद, सर्व पक्षांना ईव्हीएममध्ये गुंडाळलं असून हा सर्व ईव्हीएमचा खेळ आहे. ईव्हीएममुळे लोकशाहीला देशाला धोका निर्माण झाला आहे. ईव्हीएमचा हा खेळ आम्ही सहन करणार नाही. ईव्हीएमचा हा खेळ आम्ही हाणून पाडणार. लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर ईव्हीएम बंद झालं पाहिजे अशी मागणी सुनिल खांबे यांनी यावेळी बोलताना केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading