सीकेपी बँक पुनर्जिवित करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

सीकेपी बँकेचं पुनर्जीवन करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. सीकेपी बँक डिपॉझिटर्स फोरम, सीकेपी समाजातील मान्यवर, सीकेपी बँकेचे संचालक आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सीकेपी बँकेचं पुनर्जीवन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिलं. सीकेपी बँकेनं जप्त केलेली मालमत्ता सिडकोनं विकत घ्यावी यासाठी सिडको आणि म्हाडाला सूचना करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. त्याचप्रमाणे सीकेपी बँकेच्या पुनर्जीवनासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला आर्थिक गुंतवणूक करण्याबरोबरच सीकेपी बँकेचं पुनर्जीवन करण्यासाठीचा आराखडा तयार करण्याच्या सूचना करण्याचं मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलं. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी अशी बैठक घडवण्याचं आश्वासन सीकेपी बँक डिपॉझिटर्स फोरमला दिलं होतं त्यानुसार ही बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असंही आशिष शेलार यांनी फोरमला सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading