सिन्नर शिर्डी महामार्गावर झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर

नाशिक शिर्डी महामार्गावर आज पहाटे वावी पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसच्या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांची मदत निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याविषयी अधिक माहिती घेतली. तसंच हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या बसमध्ये एकूण ४५ प्रवासी प्रवास करत होते. तर १० जणांचा यात मृत्यू झाला असून ७ जणांची ओळख पटली आहे. बसमधील २० प्रवाशआंना जवळच्या रूग्णालयात दाखल करयण्यात आलं असून चार प्रवाशांना उपचारानंतर सोडण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading