सिग्नल शाळेतील मुलांचा जन्मदिन साजरा करून बालदिन साजरा

सिग्नल शाळेमधील मुलांचा जन्मदिन साजरा करत सिग्नल शाळेत बालदिन साजरा करण्यात आला. तीन हात नाका येथे ४ वर्षापूर्वी सिग्नल शाळेची सुरूवात झाली. या शाळेमुळं सिग्नलवर वस्तू विकणारी ४२ मुलं शिक्षणाच्या प्रवाहात आली. ठाणे महापालिका आणि समर्थ भारत व्यासपीठाच्या माध्यमातून सुरू झालेल्या या शाळेतील २ विद्यार्थी शालांत परीक्षेत उत्तीर्ण झाले. पूलाखाली जन्मलेल्या या मुलांच्या जन्म तारखेची नक्की माहिती मिळत नसल्यामुळे इतर मुलांप्रमाणे आपला जन्मदिवस कधी साजरा करायचा असा प्रश्न या मुलांसमोर निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर बालदिनाचं औचित्य साधून शाळेतील सर्व मुलांचा जन्मोत्सव शाळेत साजरा करण्यात आला. केक कापण्याबरोबरच भेटवस्तू देऊन या मुलांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading