सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून मंडप भाडं आणि अनामत रक्कम न आकारण्याचा महापालिकेचा निर्णय मात्र अति शर्तींचा पालन कराव लागणार

सार्वजनिक सण उत्सव हे पर्यावरणपूरक साजरे व्हावेत व उत्सव साजरे करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांना दिलासा मिळावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक मंडळांना मंडप भाडे व अनामत रक्कम आकारण्यात येवू नये असे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील गणेश मंडळाकडून मंडप भाडे व अनामत रक्कम आकारण्यात येवू नये असा निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्व संबंधितांना दिले आहेत.

गणेशोत्सव हा 25 दिवसांवर आला असताना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची विविध परवानग्यासाठी धावपळ सुरू आहे. सार्वजनिक मंडळांना दिलासा मिळावा या दृष्टीकोनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गणेश मंडळांना मंडप भाडे व अनामत रक्कम आकारण्यात येवू नये असा निर्णय झाला आहे, याची अंमलबजावणी महापालिका कार्यक्षेत्रात होणार असून परवानगीसाठी येणाऱ्या सार्वजनिक गणेशमंडळांकडून मंडपभाडे व अनामत रक्कम संपूर्णत: माफ करण्यात आले असल्याची माहिती आयुक्त श्री. बांगर यांनी दिली. सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना आवश्यक त्या परवानग्या विनाविलंब घेता याव्यात यासाठी प्रभागसमितीनिहाय व्यवस्था उभारण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी (रस्ते/पदपथावर) तात्पुरते स्वरुपात मंडप उभारण्याकरिता परवानगी मिळणेसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याकरिता महापालिकेने संगणक प्रणालीची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. तसेच ऑनलाईन पध्दतीने अर्ज केल्यास मंडळाना पोलीस, वाहतूक पोलीस व अग्निशमन विभागाकडे परवानगीसाठी किंवा ना हरकत दाखल्यासाठी जाण्याची गरज लागणार नाही. तसेच ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची सुविधा थेट tmcmandap.vidhsiddinfoechllp.com या लिंकवर व ठाणे महानगरपालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर 'मंडप परवानगी' या शीर्षाखली उपलब्ध आहे. सदरची लिंक दिनांक 10/09/2023 पर्यत सुरू राहणार असून त्यापूर्वी सर्व मंडळांनी ऑनलाईन सुविधेचा वापर करावा असेही आयुक्त श्री. बांगर यांनी नमूद केले. मंडप परवानगीसाठी केलेल्या ऑनलाईन अर्जासोबत मागील वर्षी दिलेल्या परवानगीची प्रत, मंडप उभारण्यात येणाऱ्या जागेचा रफ नकाशा, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नावे व मोबाईल नंबरसह यादी व मंडपात अग्निशमन सिलेंडर ठेवल्याबाबतचे अधिकृत अनुज्ञप्तीधारकाकडील प्रमाणपत्राची प्रत pdf स्वरुपात अपलोकड करावी. सार्वजनिक उत्सव मंडळांनी दहिहंडी, गणेशोत्सव व नवरात्रौत्सवासाठी सार्वजनिक ठिकाणी तात्पुरते स्वरुपात मंडप उभारण्याकरिता ठाणे महानगरपालिकेच्या धोरणानुसार आवश्यक ती परवानगी घेतल्यानंतरच मंडप उभारणीस सुरूवात करावी. मा. उच्चन्यायालयाचे आदेशानुसार परवानगी पत्राची प्रत मंडप उभारण्याच्या ठिकाणी किंवा मंडपाच्या दर्शनी भागावर लावणे बंधनकारक असेल, परवानगी पत्राची प्रत दर्शनी भागावर न लावल्यास दरचे मंडप विनापरवानगी उभारले आहे असे गृहित धरुन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच मंडळांना ऑनलाईन अर्ज सादर करताना कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवल्यास संबंधित प्रभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त यांचेशी तसेच भ्रमणध्वनी क्र. 8097192868 वर संपर्क साधाव. मा. उच्च नयालयाचे आदेश, शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना व ठाणे महानगरपालिकेच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन सार्वजनिक उत्सव साजरा करावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading