साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेला सोने खरेदीसाठी झुंबड

आज अक्षय्य तृतिया, म्हणजे साडेतीन मुहर्तांपैकी एक, वेदात म्हटल्याप्रमाणे हिंदु धर्मातील अत्यंत उत्तम दिवस. त्यामुळे एखादे शुभकार्य किंवा महत्वाची खरेदी या दिवसाचं औचित्य साधुन केली की त्या गोष्टीत भरभराट होते असं मानलं जातं म्हणून अक्षय्य तृतीयेच्या दिवशी शास्त्रापुरतं का होईना सोनं खरेदी करण्याची प्रथा आहे. अक्षय्य तृतियेच्या निमित्तानं सोनं खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडते. अक्षय्य तृतीयेचा मुहुर्त साधून अनेक नविन उपक्रमही सुरु केले जातात. आज अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्या चांदीचे दर यंदा चांगलेच वाढले असून बाजारात सोन्याचा भाव ३२००० वर होता. अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधुन सोने खरेदीसाठी झुंबड उडाली होती. काही पेढयांनी सोन्याची वळी आणि नाण्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली होती.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading