साकेत खाडीपुलाजवळील वाहतुकीत रविवारपासून बदल

राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने ठाणे ते वडपे रस्त्याचे रुंदीकरणाच्या कामामुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत खाडीपुलाजवळून साकेत सोसायटीकडे जाणाऱ्या वाहनांना साकेट कट येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. 6 मार्चपासून ते साकेत खाडीपुलाचे काम पूर्ण होईपर्यंत साकेत कट येथे प्रवेश बंद ठेवण्यात आले असल्याची माहिती वाहतूक पोलीस विभागाने दिली आहे. मुंबई – नाशिक महामार्गावरील साकेत खाडी पुलाजवळून साकेत सोसायटीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारा वाहनाना साकेत कट येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने मुंबई नाशिक महामार्गाने सरळ जावुन खारेगाव टोलनाका येथे डावीकडे वळण घेवून गॅमन मार्गे इच्छित स्थळी जातील. बाळकुमकडुन येणाऱ्या वाहिनीवरून आणि साकेत सोसायटी कडून साकेत कट मार्गे मुंबई नाशिक महामार्गाकडे जाणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना साकेत खाडी पुलाखाली साकेत कट येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. बाळकुम वाहिनी कडुन येणारी वाहने साकेत खाडी पुलाखालून महालक्ष्मी मंदिर समोरून उजवीकडे वळण घेवुन अग्नीशामक केंद्र समोरून साकेत पंक्चर येथून सरळ जावुन माजिवाडा ब्रिज खालुन उजवीकडे वळण येवून इच्छित स्थळी जातील. साकेत सोसाटीकडून येणारी वाहने महालक्ष्मी मंदिर समोरून डावीकडे वळण घेवुन अग्नीशामक केंद्र समोरून साकेत पंक्चर येचुन सरळ माजिवाडा ब्रिज खालून उजवीकडे वळण घेवुन इच्छित स्थळी जातील.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading