साई जलाराम प्रतिष्ठान च्या वतीने बाळकूम परिसरात दहिकाला उसवाचे आयोजन

ठाण्यातील साई जलाराम प्रतिष्ठान च्या वतीने बाळकूम परिसरात दहिकाला उसवाचे आयोजन करण्यात आलं असून ९ थर लावणा-या गोविंदा पथकास २ लाखांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. एका पत्रकार परिषदेत माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी ही माहिती दिली. या पारितोषिकाबरोबरच आकर्षक चषक आणि इतर अनेक आकर्षक रोख पारितोषिके असणार आहेत. या कार्यक्रमास अनेक सिने कलावंताची उपस्थिती, सांस्कृतिक कार्यक्रम मराठी कोळीगीते नृत्य आदी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे. बाळकूम गावाची मानाची हंडी फोडणाऱ्या गावकरी गोविंदा पथकास २५ हजार रूपये आणि आकर्षक चषक, महिला गोविंदा पथकास २१ हजार रूपये आणि आकर्षक चषक, तसेच ६, ७, आणि ८ थर सलामीसाठी रोख रक्कम देण्यात येईल असं संजय भोईर यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading