सस्वती मंदिर ट्रस्टच्या प्राथमिक विभागातर्फे आषाढी दिंडी काढण्यात आली होती. शाळेपासून सुरू झालेली ही दिंडी शाळेला वर्तुळाकार फिरवत पुन्हा शाळेत विसर्जित झाली. प्राथमिक विभागातील मुलं मोठ्या उत्साहाने या दिंडीत सहभागी झाली होती. ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात या मुलांनी विठ्ठल, रखुमाई तसंच वारक-यांचा वेश परिधान करून ही दिंडी काढली. या दिंडीतील काही मुलांनी परकर पोलकं तर मुलांनी वारक-यांचा वेश परिधान केला होता. लहान मुलांना आपल्या सणांची माहिती व्हावी या दृष्टीकोनातून या दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं.