कल्याणमधील कवयित्री विशाखा विश्वनाथ यांना साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर

कल्याणमधील कवयित्री विशाखा विश्वनाथ यांना साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर झाला आहे.‘स्वत:ला स्वत: विरुद्ध उभं करताना’ हा त्यांचा कविता संग्रह आहे.‘स्वत:ला स्वत: विरुद्ध उभं करताना पाठीशी असावं कोणी म्हणून म्हणायची असते प्रार्थना..’ या कवितेच्या ओळी आहेत. विशाखा यांना हा पुरस्कार मिळाल्याने कल्याणकरांची मान अभिमानाने उंचावली आहे. विशाखा यांचा जन्म जळगावमधील चाळीसगाव येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण उल्हासनगरच्या यशवंत विद्यालयात झाले. सध्या त्या कल्याणच्या लोकउद्यान येथे राहतात. त्यांचे वडिल मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात कार्यरत आहे. त्यांनी इजिनिअरिंगचे शिक्षण घेण्याचं ठरविले. मात्र, इंजिनिअरिंगमध्ये त्यांना ड्रॉप लागला. इंजिनिअरिंगचे शिक्षण सोडल्यावर त्यांनी उल्हासनगरच्या चांदीबाई महाविद्यालयातून मराठी साहित्य विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून त्या सध्या एमबीए करीत आहेत. वडिल शिक्षण विभागात नोकरीला आणि घरात कोणतीही पार्श्वभूमी नसताना मराठी हिंदी चित्रपटांकरीता कॉपीरायटिंगच्या क्षेत्रात काम करणे प्रवासच काव्यसंग्रहाचं उगमस्थान असल्याचं विशाखा यांनी सांगितलं. विशाखा विश्वनाथ यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला. त्या बदल शिवसेना कल्याण पश्चिम च्या वतीने सत्कार करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading