ठाण्यात काठ अन घाट रेस्टॉरंटला आज सकाळी भीषण आग

ठाण्यात काठ अन घाट रेस्टॉरंटला आज सकाळी भीषण आग लागली होती. सुदैवानं यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही. नितीन कंपनी सर्व्हीस रस्त्यावर हे रेस्टॉरंट असून सकाळी ७ च्या सुमारास या तळ अधिक एक मजला असलेल्या या रेस्टॉरंटला आग लागल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन पथकाचे अधिकारी-कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, नौपाडा पोलीस, महावितरणच्या कर्मचा-यांनी घटनास्थळी जाऊन मदतकार्य सुरू केले. तब्बल ४ तासांच्या प्रयत्नानंतर ही आग पूर्णपणे विझवण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading