सर्वसाधारण सभेमध्ये झालेल्या जोरदार टीकेनंतर पालिका प्रशासनानं फेरीवाल्यांविरोधात कालपासून जोरदार कारवाई सुरू केली आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत फेरीवाल्यांच्या वाढलेल्या संख्येवरून प्रशासनावर जोरदार टीका झाली होती. महापालिकेचे ९ सहाय्यक आयुक्त फेरीवाल्यांकडून हफ्ते घेत असल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर यांनी केला होता. महापौरांनीही फेरीवाल्यांवर त्वरीत कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार काल सकाळपासून विविध ठिकाणच्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. फेरीवाल्यांच्या गाड्या जप्त करण्याऐवजी या गाड्या जागेवरच तोडण्यात आल्या.