सरस्वती क्रीडा संकुलाच्या खेळाडूंनी राष्ट्रीय शालेय जिम्नॅस्टीक स्पर्धेत पटकावली १८ पदकं

स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि त्रिपुरा एज्युकेशन बोर्ड आयोजित ६४व्या राष्ट्रीय शालेय जिम्नॅस्टीक स्पर्धेत सरस्वती क्रीडा संकुलाच्या खेळाडूंनी १८ पदकं पटकावली आहेत. या स्पर्धेत २८ राज्यांमधून १२६० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत सरस्वती क्रीडा संकुलाच्या खेळाडूंनी राज्याचे प्रतिनिधीत्व करत ७ सुवर्ण, ५ रजत आणि ६ कांस्य अशी एकूण १८ पदकं पटकावली. १७ वर्ष मुलींच्या गटात पूर्वा किरवे हिनं सर्वसाधारण अजिंक्यपद, सांघिक सुवर्ण, व्हाल्ट आणि फ्लोअर या क्रीडा प्रकारात रौप्य पदक असे एकूण २ सुवर्ण आणि २ रौप्य पदकं पटकावली. सोहम नाईक हिने सर्वसाधारण तृतीय स्थान मिळवत सांघिक सुवर्ण, अनईव्हन बार सुवर्ण, फ्लोअर रौप्य तर व्हाल्ट या क्रीडा प्रकारात कांस्य पदक असे एकूण २ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य पदक पटकावलं. तर गरिमा शर्मा हिने सांघिक सुवर्णपदक मिळवलं. १४ वर्ष वयोगटात आर्यन दवंडे ह्याने पोमेल हॉर्स सुवर्ण, व्हाल्ट आणि रिंग्ज या क्रीडा प्रकारात कांस्य असे १ सुवर्ण आणि २ कांस्य पदकं पटकावली. मानस मानकवळेनं पोमेल हॉर्स हॉरिझोन्टल या क्रीडा प्रकारात कांस्य पदक पटकावले. १४ वर्ष वयोगटात श्रेयस मंडलिकने सांघिक रौप्य तर पॅरलल बार प्रकारात कांस्य पदक पटकावलं. १९ वर्ष वयोगटात कार्तिक पडाळकरनं सांघिक रौप्य, मुलींच्या गटात साक्षी पिंपळे हिनं सांघिक सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेतून पुण्यात होणा-या खेलो इंडिया या स्पर्धेकरिता पूर्वा किरवे, सोहम नाईक, गरिमा शर्मा, साक्षी पिंपळे आणि श्रेयस मंडलिक यांची निवड करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading