समाजातील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांना अंदराजंली

आदिवासी महादेव कोळी समाजातील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी स्वातंत्र्याच्या लढ्या साठी व गोरगरीब जनतेची सावकारांच्या अन्यायापासून, त्यांच्या गुलामीतून सुटका करण्यासाठी अनेक आंदोलन केली, अनेक लढे दिले, स्वातंत्र्याच्या इतिहासाची पाने पुन्हा पुन्हा चाळली तर लक्षात येते आदिवासी समाजातील क्रांतिवीरांचा प्रथम उल्लेख केल्या शिवाय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास लिहिला जाऊ शकत नाही, या आध्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांना 2 मे 1848 रोजी ठाणे मध्यवर्ती कारागृहात इंग्रजांनी फाशी दिली या घटनेला आज 174 वर्ष पूर्ण झाली, म्हणून आज सोमवारी दिनांक 2 मे 2022 रोजी यांच्या स्मृतीस उजाळा देण्यासाठी आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना तर्फे आदरांजली वाहण्यात आली,या प्रसंगी मधुकर पिचड, आमदार निरंजन डावखरे, संजय केळकर, वैभवराव पिचड, आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज खेवरा,ठाणे शहर अध्यक्ष हेमंत जाधव, सचिव तुकाराम वरठा, आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे प्रतिष्ठान अध्यक्ष सुनिल भांगरे, ठाणे शहर संघटक निलेश महाले, आदिवासी एकता परिषद पालघर सचिव डॉ. सुनिल पराड, नवी मुंबई संपर्क प्रमुख रमेश डोळे व मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading