शहर विद्रुपीकरण करणा-या ३६ जणांवर गुन्हे दाखल

महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेच्या ९ प्रभाग समिती अंतर्गत अनधिकृतपणे जाहिरात फलक, भित्तीपत्रके लावून शहर विद्रुपीकरण करणा-या एकूण ३६ जणांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई सहाय्यक आयुक्तांमार्फत करण्यात आली.
शहरातील रस्ते, दुभाजक तसेच चौकात अनधिकृतपणे जाहिरात फलक, बोर्ड, बँनर्स, स्टिकर, भित्तीपत्रके लावून शहर विद्रुप करणा-या व्यक्ती व संस्थेविरुद्ध महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण कायदा -१९९५ अंतर्गत तात्काळ कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी सर्व प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तांना दिले होते, त्यानुसार ३६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading