सफायर आणि वेदांत हॅास्पीटलमध्येही गरिबांसाठी विनामूल्य उपचार

होरायझनपाठोपाठ आता सफायर आणि वेदांत हॅास्पीटलमध्येही गरिबांसाठी कोविड -19वर विनामूल्य उपचार सुरू करण्यात आले आहेत. महापालिका क्षेत्रातील कोव्हीड बाधित गरीब गरजू नागरिकांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत विनामूल्य उपचार मिळणार आहेत. कोव्हीड घोषित रुग्णालयांमध्ये गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांना कमीत कमी दरात योग्य उपचार मिळावेत यासाठी महापालिका प्रशासन आग्रही होते याच पार्श्वभूमीवर पिवळे केशरी रेशनकार्डधारक आणि मध्यम उत्पन्न गटातील नागरीकांना होरायझन प्राईम हॉस्पिटलमध्ये याधीच विनामूल्य उपचार सुरू करण्यात आले असून आता सफायर आणि वेदांत हॅास्पीटलमध्येही ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत उच्च प्रतीचे उपचार, अत्याधुनिक सुविधा आणि पौष्टिक जेवण सर्व रूग्णांना विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेसाठी नि:शुल्क हेल्पलाईन नंबर 14555 / 1800111565 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading