सुप्रसिध्द इतिहास संशोधक आणि लेखक सदाशिव टेटविलकर लिखित असे आपले ठाणे या पुस्तकाचं प्रकाशन झालं. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं. गड, किल्ले, लेणी, मंदिर, मूर्ती अशा नानाविध दुर्लक्षित इतिहास खुणांवर प्रकाशझोत टाकत प्रेरणादायी इतिहासाचा मागोवा घेणा-या ९ वाचकप्रिय पुस्तकांनंतर ठाण्याच्या इतिहासाचा वेध घेणारे असे आपले ठाणे या पुस्तकाचं प्रकाशन झालं. या प्रकाशन सोहळ्यास प्राच्यविद्या अभ्यास संस्थेचे डॉ. विजय बेडेकर, श्रीकृपा प्रकाशनाचे विश्वनाथ साळवी आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.