संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या मैदानावर विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास 21 लाख रुपयांचं पारितोषिक

वर्तकनगर येथील महानगरपालिका शाळेच्या मैदानावर संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे प्रताप सरनाईक फाऊंडेशनच्या माध्यमातून दहीहंडी उत्सवाचे दरवर्षीप्रमाणे आयोजन होणार असून मंडळाचे हे २७ वे वर्ष आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पुर्वसंध्येला दि. ६ सप्टेबर, २०२३ रोजी रात्री १२ वाजता हिंदू संस्कृतीप्रमाणे रितसर दहीहंडीचे पुजन करून हंडी बांधण्यात येणार आहे. दि. ७ सप्टेबर, २०२३ ला दुपारी १२ वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ठाणे, मुंबई व महाराष्ट्रातील येणार्या प्रत्येक संघाची सलामी स्विकारण्यात येणार असून सायंकाळी ६ ते १० वाजेपर्यंत प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

या उत्सवामध्ये १२ ते ६ च्या दरम्यान ४ थर, ५ थर, ६ थर लावून सलामी देणार्या प्रत्येक गोविंदा पथकाला हेल्मेट व सेफ्टी किटसह १० हजाराचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच ७ थर लावणार्या गोविंदा पथकाला २५ हजार रोख व ट्राफी व ८ थर लावून सलामी देणार्या गोविंदा पथकाला १ लाख रोख व ट्राफी देण्यात येणार असून सर्वप्रथम ९ थर लावणार्या गोविंदा पथकाला ११ लाख रूपये व ट्राफी व त्यानंतर ९ थर लावणार्या गोविंदा पथकाला ५ लाख रोख व ट्राफी देण्यात येणार आहे. तसेच संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या मैदानावर विश्वविक्रम मोडणार्या गोविंदा पथकाला २१ लाख रूपये रोख व ट्राफी अश्या प्रकारची पारितोषिके पुरूष गोविंदा पथकांसाठी असतील.

त्याचप्रमाणे महिला गोविंदा पथकांसाठी ४ व ५ थर लावणार्या गोविंदा पथकाला हेल्मेट व सेफ्टी किटसह प्रत्येकी १० हजाराचे पारितोषिक तर ६ थर लावणार्या महिला गोविंदा पथकाला २५ हजार रोख व ट्राफी तसेच अंध व अपंग गोविंदा पथकाला सलामीसाठी प्रत्येकी हेल्मेट व सेफ्टी किटसह १० हजाराचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच गोविंदांचे थर रचत असताना उंचीची स्पर्धा न करता सामाजिक संदेश व चांगल्या प्रकारचा देखावा गोविंदा पथकांनी मनोर्यांच्या माध्यमातून दाखवणार्या गोविंदा पथकाला प्रत्येकी २५ हजाराचे विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच पहिल्यांदाच ठाणे शहरातील पत्रकार छायाचित्रकारांसाठी दहीहंडी फोटो स्पर्धा आयोजीत केली असल्याचे प्रो-गोविंदाचे आयोजक श्री. पुर्वेश सरनाईक यांनी सांगितले.

सर्व गोविंदा पथकांमध्ये आनंदाचे वातावरण असून यावर्षी ३०० हून अधिक गोविंदा पथकांनी आतापर्यंत प्रताप सरनाईक फाऊंडेशनमध्ये सहभागी होण्यासाठी आपली नावे नोंदविलेली आहेत. राज्य शासनाच्या वतीने १ लाख गोविंदांना विम्याचे संरक्षण दिल्यामुळे स्थानिक पातळीवर सुरक्षितेच्या दृष्टीने व आरोग्य विषयक सर्व काळजी घेत असल्याची माहिती आयोजक आमदार श्री. प्रताप सरनाईक व प्रो-गोविंदाचे आयोजक श्री. पुर्वेश सरनाईक यांनी दिली.

या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणविस, मा. श्री. अजितदादा पवार यांच्यासह मंत्रीमंडळातील सर्व मंत्र्यांना व नेत्यांना आमंत्रीत करण्यात येणार असून मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील नामवंत सिनेअभिनेते व अभिनेत्रींना आमंत्रीत करण्यात येणार आहे. तसेच विशेष अतिथी म्हणून स्पेन बर्सिलोनाचे प्रशिक्षक श्री. मायकल फेरेट मिरललेस, श्री. फेलिक्स फेरेट फ्रेइक्सएडिस ह्यांना सुध्दा आमंत्रीत करण्यात आलेले आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading