संस्कार भारती तर्फे नववर्षाच्या स्वागतासाठी १० हजार फूटांची महारांगोळी

संस्कार भारती तर्फे, ठाण्यातील गांवदेवी मैदानावर नववर्षाच्या स्वागतासाठी १० हजार फूटांची महारांगोळी चितारली जाणार आहे. ‘G 20’ हा विषय घेऊन त्यात समाविष्ट असलेले features जसे की आर्थिक स्थिरता, महिला सशक्तिकरण, पर्यावरण, वसुधैव कुटुंबकम, तृणधान्य, योग, शिक्षण तसेच G20 मधील सहभागी देश या रांगोळीमधून चित्रीत केले जाणार आहे. या वर्षी भारताला यजमानपद मिळाले ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे.
रांगोळीबरोबरच गुप्ते यांची कागदी शिल्पकला, आगाशे यांचे नखचित्र प्रात्यक्षिक आणि त्यांच्या संस्थेची देहदान नेत्रदानाची माहिती, मातीकाम कार्यशाळा आपल्याला मंगळवार २१ आणि बुधवार २२ रोजी रात्री १० पर्यंत विनामूल्य पाहता येईल.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading