सँडोज कंपनीकडून दोन कार्डिॲक ॲम्बुलन्स आणि 20 आय सी यु बेड भेट

सँडोज कंपनीच्या वतीने छत्रपती शिवाजी रुग्णालयाला कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून दोन कार्डिॲक ॲम्बुलन्स आणि 20 आय सी यु बेड भेट देण्यात आल्या. त्याचं लोकार्पण पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. या अँबुलन्स आणि बेडच्या माध्यमातून रुग्णांची अधिक सेवा करता येईल. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जवळपास पंधराशे बाह्यरूग्ण आहेत. तर या रुग्णालयात सर्व प्रकारच्या सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी शिंदे यांनी सांगितले. तसेच या रुग्णालयात सर्वच प्रकारच्या शस्त्रक्रिया सुरू होणार असून रुग्णांना सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल प्रमाणे सेवा देण्यात येईल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading