श्रीनगर पोलीस ठाण्यात महिला पोलीसाने केली आत्महत्या

श्रीनगर पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलीस नाईक अनिता वाव्हळ यांनी गळफास लावून आत्महत्या केली. अनिता वाव्हळ या आज सकाळी साडेदहा वाजता नेहमीप्रमाणे कर्तव्यावर हजर झाल्या. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अंमलदार त्यांना फोन करत होत्या. परंतु त्या फोन उचलत नव्हत्या. म्हणून त्यांनी महिला कक्षात जाऊन प्रत्यक्ष पाहिले असता, महिला पोलीस नाईक अनिता वावळ यांनी ओढणीने फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. घरगुती कारणास्तव आत्महत्या केल्याचे सांगण्यात आलं. या दुर्दैवी घटनेची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी दिले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading