शिवसेना नगरसेवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

कळव्यातील शिवसेनेचे नगरसेवक गणेश कांबळे यांनी आज आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांना ठाण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असुन अदयाप ते बोलण्याच्या स्थितीत नसल्याने पोलीसांना जबाब घेता आलेला नाही. कौटुंबिक वादातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे समजते. कळव्यातील गणेश कांबळे हे शिवसेनेचे नगरसेवक असून त्यांनी घरातील किटकनाशक प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. ते बोलण्याच्या स्थितीत नसल्याने कळवा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यत याबाबत नोंद केली नव्हती.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading