शासनाने कोचिंग क्लासेसनाही परवानगी द्यावी – कोचिंग क्लासेस संघटनेची मागणी

सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरू असून कोचिंग क्लासेसनाही परवानगी द्यावी अशी मागणी राज्य कोचिंग क्लासेस संघटनेचे अध्यक्ष सतिश देशमुख यांनी शासनाकडे केली आहे.

महाराष्ट्रातील जवळपास सर्वच व्यवसाय हे सध्या सुरू झाले आहेत. परंतु सर्वसामान्य क्लासेस संचालक मात्र शासनाच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. कोचिंग क्लासेसना शासनानं अद्यापही परवानगी दिलेली नाही. सध्या क्लासेस संचालक घरखर्च, क्लासेस रूम भाडे, शिक्षकांचा पगार, ऑनलाईन अयशस्वी प्रयत्न अशा अनेक गोष्टींचा विचार करून डिप्रेशन मध्ये गेले आहेत. विद्यार्थी सुद्धा शासनाने शैक्षणिक धोरण जाहीर न केल्याने बिनधास्त आणि बेफिकिर झाले आहेत. त्यांचा खूपच शैक्षणिक दर्जा खालावलेला आहे. त्यामुळे शासनाने निदान 5-10 विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading