शहरात ७८ लसीकरण केंद्रात नियमित लसीकरण सुरु

कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत शहरात ७८ लसीकरण केंद्राद्वारे व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम सुरु असून कोरोनाचा सामना करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन महापौर आणि महापालिका आयुक्तांनी केले आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी तयार करण्यात आलेल्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसीचा डोस देण्याचे काम सुरू आहे. शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या लसीकरण साठ्यानुसार महापालिका तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये नागरिकांना पाहिला आणि दुसरा डोस देण्यात येत आहे. प्रत्येक या लसीकरण सेंटरमध्ये वैद्यकीय अधिकारी, व्हॅक्सिनेटर, डेटा ऑपरेटर आणि निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरात आतापर्यंत २७ हजार ८५७ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला तर १८ हजार ५९४ कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ३१ हजार ५१२ फ्रंटलाइन कर्मचा-यांना पहिला तर १८ हजार ५८९ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ४५ ते ६० वयोगटातंर्गत ३ लाख १५ हजार १०५ लाभार्थ्यांना पहिला तर २ लाख ५७ हजार ६५७ लाभार्थ्यांना दुसरा डोस, ६० वर्षावरील २ लाख ७ हजार ८०३ लाभार्थ्यांना पहिला तर १ लाख ४३ हजार २०५ लाभार्थ्यांना दुसरा डोस तसेच १८ ते ४४ वयोगटातील ८ लाख ३५ हजार १९२ लाभार्थ्यांना पहिला तर ६ लाख ५७ हजार ५४२ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तसंच १५ ते १८ वयोगटातील २३ हजार ३०३ मुलांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तर ७२१ गर्भवती महिला, २ हजार ३२५ स्तनदा माता, ५२ तृतीय पंथाचे आणि अंथरुणाला खिळून पडलेल्या ६०२ व्यक्तींचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. महापालिकेच्या लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत एकूण २५ लाख ३६ हजार ३५९ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading