शरद यादव, नेहा दांडेकर यांना गुणवंत खेळाडू तर श्रीनिवास गुप्ता यांना गुणवंत मार्गदर्शक पुरस्कार जाहीर

जिल्ह्यातील तीन खेळाडूंना जिल्हा क्रीडा पुरस्कार घोषित झाले असून पॉवरलिफ्टिंग खेळाडू शरद यादव, जिम्नॅस्टिकपटू नेहा दांडेकर यांना गुणवंत खेळाडू म्हणून तर ॲथलेटिकपटू श्रीनिवास गुप्ता यांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देण्यात येणार आहे. येत्या शुक्रवारी जिल्हाधिका-यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी स्नेहल साळुंखे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू आणि गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे योगदान आणि मूल्यमापन होऊन त्यांच्या गौरव सोहळा व्हावा या उद्देशाने जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येते. 2020-21 साठी जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी जिल्ह्यातून तीन जणांची निवड जिल्हा पुरस्कार निवड समितीने केली आहे. रोख 10 हजार रूपये, सन्मानचिन्ह आणि गौरव पत्र असं पुरस्कारचे स्वरूप आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून जिल्ह्याचे नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल पॉवरलिफ्टिंग खेळाडू शरद यादव यांना पुरूष गुणवंत खेळाडू म्हणून तर जिम्नॅस्टिक खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणा-या नेहा दांडेकर हिला महिला गुणवंत खेळाडू म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. गेल्या दहा वर्षात जिल्ह्यात अनेक राष्ट्रीय पदक प्राप्त ॲथलेटिक्स खेळाडू घडवून आणल्याबद्दल मार्गदर्शक श्रीनिवास गुप्ता यांना गुणवंत मार्गदर्शक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading