व्हॅली टॉवर मधील ट्रान्सफॉर्मर हटवण्याच्या मागणीसाठी सोसायटीमधील रहिवाशांचं आंदोलन

व्हॅली टॉवर मधील ट्रान्सफॉर्मर हटवण्याच्या मागणीसाठी या सोसायटीमधील रहिवाशांनी आज आंदोलन केलं. खेवरा सर्कल येथे व्हॅली टॉवर ही मोठी सोसायटी असून या सोसायटीच्या आवारात मोठा विजेचा ट्रान्सफॉर्मर आहे. तिथूनच उच्च दाबाच्या वाहिन्या जातात. या वाहिन्यांना यापूर्वीही अनेकदा आगी लागल्या आहेत. याबाबत सोसायटीनं अनेकवेळा महावितरणकडे तक्रारी केल्या पण तरीही काहीच फरक पडलेला नाही. काल संध्याकाळच्या सुमारास २२ केव्ही उच्चदाबाच्या वाहिनीला अशीच आग लागली होती. पण सुदैवानं कोणतीही दुर्घटना घडली नाही. आग लागल्यामुळे ही उच्चदाब वाहिनी तुटून खाली पडली. त्यावेळी सोसायटीच्या आवारात १५ ते २० रहिवासी होते. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथकासह महावितरण तसंच अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनी धाव घेतली. महावितरणच्या कर्मचा-यांनी वीजपुरवठा खंडीत केला. तर अग्निशमन दलानं ही आग नियंत्रणात आणली. यामुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी हा ट्रान्सफॉर्मर हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं. महावितरणचे अधिकारी या ठिकाणी आले होते. त्यांनी हा ट्रान्सफॉर्मर हटवण्याचं काम उद्यापासून सुरू करण्याचं आश्वासन रहिवाशांना दिलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading