व्हिस्टाडोम कोचमुळे पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील निसर्गाचा आनंद प्रवाशांना लुटता येणार

मुंबई- पुणे मार्गावर येत्या शनिवारपासून प्रथमच व्हिस्टाडोम कोच गाडी धावणार आहे. पश्चिम घाटावरील नदी, खोरे, धबधबे यांच्या अविरक्षित दृश्यांचा आनंद यामुळे प्रवाशांना लुटता येणार आहे. रेल्वेने मुंबई – पुणे विशेष डेक्कन एक्सप्रेस ट्रेनच्या सेवा व्हिस्टाडोम कोचसह पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गावर प्रथमच ही ट्रेन व्हिस्टाडोम कोचसह चालणार आहे.मुंबई- गोवा मार्गावरील प्रवाशांना उपलब्ध असलेले व्हिस्टाडोम कोचमधील प्रवास करतानाचे पश्चिम घाटाचे अनुभव आता मुंबई-पुणे मार्गावरही उपलब्ध होतील. आता मुंबई- पुणे मार्गावरील प्रवासी येथून जातांना जवळच्या माथेरान टेकडी, सोनगीर टेकडी, उल्हास नदी, उल्हास व्हॅली, खंडाळा परिसर आणि लोणावळा तसंच दक्षिण पूर्व घाट विभागातील बोगदे -धबधबे या निसर्गरम्य सौंदर्याचा आनंद घेऊ शकतात. विस्टाडोम कोचच्या मूलभूत विशेष वैशिष्ट्यांमध्ये वाइड विंडो पॅन आणि काचेचे छप्पर, फिरण्यायोग्य खुर्ची आणि पुशबॅक खुर्च्यांचा समावेश आहे. या गाड्यांमध्ये केवळ कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच प्रवास करता येणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading