व्हर्च्युअल लंडन मॅरेथॉनमध्ये ठाण्यातून ८ धावपटू होणार सहभागी

उद्या होत असलेल्या लंडन मॅरेथॉन स्पर्धेत ठाण्यातून ८ मॅरेथॉन पटू सहभागी होणार आहेत. सध्याच्या करोनामय वातावरणामुळे या ८ स्पर्धकांना थेट मॅरेथॉनमध्ये सहभागी होता येणार नाही. मात्र लंडन मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजकांनी या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्याची संधी दिली आहे. त्यासाठी लंडन मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजकांनी धावपटूंना एक ॲप दिलं असून या ॲपद्वारे ते व्हर्चुअली या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होणार आहेत. उद्या सकाळी ठाण्यातील हे सात स्पर्धक लंडन मॅरेथॉनसाठी ठाण्यातून धावणार आहेत. आपल्याकडील दमट हवामानामुळे हे स्पर्धक पहाटे साडेचारच्या सुमारास धावण्यास सुरुवात करणार आहेत. या स्पर्धकांनी यासाठी 42 किलोमीटरचा मॅरेथॉन मार्ग तयार केला असून तो डोंगरदऱ्यातून जात आहे. या स्पर्धकांना उष्म्याचा कोणताही त्रास होऊ नये म्हणून काही स्वयंसेवक विविध ठिकाणी त्यांना मदत करणार आहेत. लॉकडाऊन असतानाही गेले तीन महिने हे स्पर्धक आपल्या घरीच स्पर्धेची तयारी करत होते. टेनिसमध्ये ज्याप्रमाणे ग्रँडस्लॅम हा किताब असतो त्याप्रमाणे मॅरेथॉन स्पर्धेतही ६ मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना मेजर म्हणून संबोधलं जातं. ठाण्यातील डॉ. महेश बेडेकर यांनी अशा सहा मॅराथॉन स्पर्धा पूर्ण केल्या असून गेल्या वर्षी झालेल्या बोस्टन येथील मॅरेथॉन स्पर्धेतही ते पात्र ठरले होते. त्यावेळी त्यांनी तीन तास पंधरा मिनिटांची वेळ दिली होती. आता उद्या होणाऱ्या लंडन मॅरेथॉनमध्ये ठाण्यातून डॉ. महेश बेडेकर, सारिका सामंत, गीतांजली, यशवंदर सिंग, आदित्य राठ, रवि नाडर, हंस आणि विजय गंभीर हे या व्हर्चुअल मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading