अन्न आणि औषध प्रशासनाच्या ठाणे कार्यालयानं १ कोटी ७० लाख रूपयांचा प्रतिबंधित पदार्थांचा साठा केला जप्त

अन्न आणि औषध प्रशासनाच्या ठाणे कार्यालयानं १ कोटी ७० लाख रूपयांचा पानमसाला, गुटखा, सेंटेड तंबाखू सारखा प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त केला असून ५ वाहनंही ताब्यात घेतली आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाच्या ठाणे कार्यालयाला गोपनीय माहिती मिळाली होती. घोडबंदर रस्त्यावरून हे पदार्थ आणले जाणार असल्याची माहिती मिळाल्यामुळं पाळत ठेवण्यात आली होती. माहितीनुसार हा साठा घेऊन जाणारी वाहनं तपासली असता यात एसजीआर-२००० गुटखा, नझर ९० हजार गुटखा, विमल पानमसाला, रजनीगंधा पानमसाला, राजश्री पानमसाला, रूबाब पानमसाला, शुध्द प्लस पानमसाला, रोकडा गोल्ड पानमसाला, मुसाफिर पानमसाला, व्ही वन सुगंधित तंबाखू, के पी ब्लॅक लेबल सुगंधित तंबाखू, मिराज सुगंधित तंबाखू असे प्रतिबंधित पदार्थ जप्त करण्यात आले. याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading