वुई आर फॉर यु च्या सेवेक-यांचा महापौरांच्या हस्ते सन्मान

वुई आर फॉर यु च्या सेवेक-यांचा महापौरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आदित्य प्रतिष्ठानच्या वुई आर फॉर यु अभियानांतर्गत कोरोना काळात २१ मार्च पासून ज्येष्ठ नागरिक आणि गरजूंना मोफत, घरपोच सेवा देण्याचे सेवाकार्य गेले सात-आठ महिने दिवसरात्र सुरू आहे. सुरूवातीला साडेचार हजार मास्कचे वाटप नौपाड्यातील ज्येष्ठ नागरिक आणि गरजूंना करण्यात आले तर जुन्या ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकांना सेवा देण्याचं सेवाकार्य वुई आर फॉर यु चे सेवेकरी करत होते. सुरूवातीच्या काळात घरपोच भाजीसेवा सुरू करण्यात आली. नंतर नाशिकहून आलेली भाजी थेट पिशव्यांमध्ये भरून ऑनलाईन पध्दतीनं गरजूंना घरपोच देण्यात आली. एकटे राहत असलेले ज्येष्ठ नागरिक अथवा घरातील एखादा अंथरूणाला खिळून आहे अशा ८० ज्येष्ठ नागरिकांना टिफीन सेवा दिली जात असून त्यापैकी ५० टक्के ज्येष्ठांना विनामूल्य सेवा देण्यात आली. दैनंदिन जीवनात लागणा-या किराणा मालाची यादी घेऊन त्यांना किराणा माल, औषधं घरपोच देण्यात आली. कोरोना रूग्ण आढळल्यास त्या परिसराची तसंच वास्तूची मोफत निर्जंतुकीकरण करण्याची सुविधाही वुई आर फॉर युच्या माध्यमातून देण्यात आली. आजपर्यंत ५५ कोरोना रूग्णांना प्लाझ्मा दान करण्यात आला. ८०० रूग्णांचं समुपदेशन करण्यात आलं. करोना पॉझिटिव्हचा रिपोर्ट आल्यावर योग्य त्या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. यासाठी नौपाडा विभागात ५५ सेवेकरी सेवा देत असत. या सर्वांचा महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading