विशेष सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे यांनी विषय समिती सभापतींचे खाते वाटप केले. सुभाष पवार यांना अर्थ आणि शिक्षण समिती, कुंदन पाटील यांना बांधकाम आणि आरोग्य समिती, संजय निमसे यांना कृषी,पशुसंवर्धन, दुग्धशाळा समिती असे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या महिला- बाल कल्याण समिती सभापती पदी रत्नप्रभा तारमळे, तर समाजकल्याण समिती सभापती पदी नंदा उघडा यांची यापूर्वीच पदसिध्द सभापती म्हणून निवड झालेली आहे. तसेच या सभेत विविध समित्यांवर रिक्त झालेल्या सदस्यांची पद भरण्याबाबत मंजुरी देण्यात आली. शासनाने निर्गमित केलेल्या कोव्हिड १९ चे नियम पाळून सभा घेण्यात आली.