ठाण्यात २० सप्टेंबरला पल्स पोलिओ लसीकरण मोहिम

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 20 सप्टेंबरला उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात येणार आहे. 0 ते 5 वर्षापर्यतच्या सर्व बालकांना विहित वयात प्राथमिक लसीकरण, नियमित एएफपी सर्व्हेक्षण आणि पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत 0 ते 5 वर्षाखालील सर्व बालके संरक्षित करणे यासाठी राज्यात सन 1995 पासून उप राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम दरवर्षी राबविण्यात येते. ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत कार्यरत सर्व आरोग्य केंद्रामध्ये लस मोफत उपलब्ध करण्यात आल्या असुन त्याचा लाभ पालकांनी 5 वर्षापर्यंच्या सर्व बालकांना द्यावा असे आवाहन महापालिकेनं केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading