ठाण्यात सरासरीच्या पेक्षा अधिक पाऊस

ठाणे जिल्ह्यात यंदा दमदार पाऊस झाल्याने धरणे तृप्त झाली असुन जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खरीप हंगामानंतर रब्बी हंगामालाही ‘ अच्छे दिन’ येण्याच्या आशेने बळीराजा सुखावला आहे. ठाणे जिल्ह्यात यंदा आतापर्यंत सरासरी एकूण २६३६ मि.मी. म्हणजेच सरासरी १०९.०३ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे मुंबई-ठाण्याला पाणीपुरवठा करणारी धरणे भरल्याने ठाणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. मुबलक पावसामुळे उल्हास नदीची (बदलापूर) इशारा पातळी १६.५० मीटर असुन आजची पातळी १२.८० मीटर आहे. उल्हास नदी (मोहने) येथील इशारा पातळी ९ मीटर असुन आजची पातळी ४.२० मीटर आहे. उल्हास नदी (जांभूळपाडा) येथील इशारा पातळी १३ मीटर असुन आजची पातळी ९.८५ मीटर इतकी नोंदवली गेली आहे. काळू नदीची (टिटवाळा) इशारा पातळी १०२ मीटर असुन आजची पातळी १००.५० मीटर आहे.भातसा नदी (सापगाव) येथील नदीची इशारा पातळी ३५. ०६ मीटर असुन आजची पातळी ३० मीटर असल्याचे प्रशासनाने सांगितले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading