विविध कामांचं भूमिपूजन तसंच दादा कोंडके ॲम्पीथिएटरचं येत्या सोमवारी लोकार्पण

गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत नागरिकांना दिलेल्या वचननाम्याची पूर्तता करीत वागळे इस्टेट विभागामध्ये दादा कोंडके ॲम्पीथिएटर लोकार्पण तसंच पार्किंग व्यवस्था, सॉफ्ट मोबीलिटी, हँगिग गार्डनच्या कामांचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते येत्या सोमवारी होणार आहे. या ॲम्पीथिएटमध्ये 300 ते 350 प्रेक्षकांसाठी बैठक व्यवस्था असून कलावंतासाठी दोन ड्रेसिंग रुम आदी विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या माध्यमातून ठाणेकरांनी सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण झालं असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितलं. तसेच रहेजा गार्डन येथे हँगिग गार्डनच्या कामाचा शुभांरभ देखील यावेळी करण्यात येणार आहे, यामुळे या परिसरातील नागरिकांना भव्य असे उद्यान उपलब्ध होणार आहे, या गार्डनमध्ये ध्यानमंदिर आणि योगासाठीही सुविधा उपलब्ध असणार आहे. ज्ञानसाधना महाविद्यालयासमोरील सेवा रस्त्यालगत असलेला नाला बंदिस्त करुन त्यावर अद्ययावत अशी पार्किंग व्यवस्थेची सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या कामाचे भुमीपूजन करण्यात येणार आहे. यामुळे या विभागात येणाऱ्या नागरिकांचा पार्किंग व्यवस्थेचा प्रश्न देखील काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे. सध्याचे धावपळीचे युग असून प्रदुषणावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीकोनातून देखील सायकल ट्रॅक तयार करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. ही कामे तातडीने पूर्ण करण्यात येणार असल्याचंही महापौरांनी सांगितलं. त्याचप्रमाणे संकल्प चौक, रघुनाथ नगर ते ठाणे स्टेशन अशी नवीन परिवहन बससेवा सुरू करण्यात येत असून या कामाचा शुभारंभ देखील यावेळी होणार आहे. या बससेवेमुळे या विभागातील नागरिकांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading